मुंबई उच्च न्यायालयाने SRA ची घरे विकणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. 5 वर्षांच्या आत घरे विकण्यास मनाई करणारे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वांद्रे येथील एका SRA प्रकल्पात 803 पैकी 410 लाभार्थ्यांनी अवघ्या 8 महिन्यांत घरे विकल्याचे समोर आले. न्यायालयाने यावर तीव्र संताप व्यक्त करत SRA अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.