'जातीय आरक्षणाला विरोध आहे, आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवरच मिळावे,' असे मोठे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. एनडीटीव्ही युवा कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यांना शिक्षण परवडत नाही, अशा गरजू लोकांनाच आरक्षण मिळायला हवे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.