पहिलीपासून Hindi सक्तीची, मराठी अभ्यास केंद्राचे अभ्यासक दीपक पवार यांचं विश्लेषण | NDTV मराठी

राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 'राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024'नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आता मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ