कोरोना किंवा कोविड ही तीन अक्षरं उच्चारली की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. तो अनुभव पुन्हा नको असं आपण आपसूकच मनातल्या मनात म्हणून जातो. अवघ्या जगाला नामोहरम करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला खीळ बसवणाऱ्या या कोरोनाच्या संकटाला आता पाच वर्ष उलटून गेली आहेत. पण पाच वर्षानंतर नंतर पुन्हा एकदा चीनने जगाची चिंता वाढवली आहे.