चार दिवसांपासून सातत्यानं पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय. विशेषतः पुण्यातील पिरंगट या परिसरात काल वादळी वाऱ्यामध्ये एक मोठं होर्डिंग पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. पिरंगुट परिसरात आता देखील अनेक मोठमोठे होर्डिंग्स हे फाटलेल्या अवस्थेत दिसून येतायत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.