आयकर विभागाने देशभरातील सुमारे २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रख्यात सीएचे कार्यालय आणि निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही झडती सत्र सुरूच होते. या ठिकाणी 48 तासापासून कारवाई सुरू आहे, अजून दोन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तपासणीअंती ३०० हून अधिक पक्षकारांची खाती तपासल्यानंतर त्यात संशयास्पद माहिती हाती लागल्याचे वृत्त आहे. आणखी दोन दिवस कारवाई चालणार आहे.