टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला धुळ चारलीय. विश्वचषक सामन्यांमधील पाकिस्तानची हाराकीरी कायम राहिलीय.. हा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण भारताने पाकिस्तान विरोधातील हा सामना एकतर्फी खेचला. भारताने पाकिस्तानला 20 षटकांमध्ये 176 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. भारताने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानचे 3 फलंदाज बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. हार्दिक पंड्याने भारतला ब्रेक थ्रू दिला होता. तसच हार्दिकनेच शेवटी विकेट घेत भारताला मोठा विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 18 षटकांमध्ये सर्वबाद 114 धावांपर्यंतच मजल मारली.