सांगलीच्या मिरज पूर्व भागामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटेमुळे बेडग येथील शेतकर्यांचे हळद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातून हळद काढून त्याची प्रक्रिया करण्यासाठी शेतामध्ये वाळण्यासाठी ठेवलेली हळद ही या गारपिटीमुळे आणि पावसामुळे भिजली आहे. त्यामुळे हळद कुजू लागली आहे. तब्बल 25 क्विंटल हळदीचे नुकसान झाले आहे. आणि शेतकऱ्याला पाच लाखाचे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे...याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी....