#IndurikarMaharaj #Kirtankar #Engagement "लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण" ही म्हण आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना उद्देशून वापरली जात आहे. ते आपल्या कीर्तनात लोकांना साध्या पद्धतीने लग्न करण्याचा सल्ला देतात, मात्र त्यांच्या मुलीचा नुकताच झालेला साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडला. यामुळे लोकांनी त्यांच्या उपदेश आणि कृतीमधील फरक पाहून प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमका काय आहे हा प्रकार, पाहा सविस्तर वृत्त.