Dharavi Experience Centre | कसं आहे 22,500 स्क्वेअर फुटांवर उभारलेलं धारावी एक्सपीरियन्स सेंटर
Dharavi Experience Centre | What the 22,500-square-foot Dharavi Experience Centre is like.
धारावीकरांचं घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. धारावी म्हणजे आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी... मात्र आता या धारावीचा पुनर्विकास फक्त कागदावर न राहता तो प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरताना दिसतोय. धारावीकरांचं भविष्यातलं घर कसं असेल. रस्ते, गार्डन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा असतील याची प्रत्यक्ष अनुभूती आता धारावी एक्सपिरिअन्स सेंटरमध्ये घेता येणार आहे. 22 हजार 500 चौरस फुटांचं हे भव्य एक्सपिरिअन्स सेंटर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या धारावी एक्सपिरिअन्स सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. धारावीचा इतिहास आणि उद्योगविश्वाचा वारसा अत्याधुनिक अशा 3D वॉकथ्रूद्वारे पाहता येणार आहे. धारावीमध्ये निवासी टॉवर्स, व्यावसायिक संकुलं, अंतर्गत रस्ते, मेट्रो आणि बस वाहतूक व्यवस्था, आधुनिक शाळा, हॉस्पिटल्स आणि मनोरंजन उद्यानं कशी अशतील याची झलक यात पाहता येणार आहे. पुनर्विकासात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 40 हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर मिठी नदीच्या लगत 3.3 किलोमीटर लांबीचा सुंदर आणि हरित ‘रिव्हरफ्रंट’ विकसित केला जाईल. यामुळे धारावीत मोठ्या प्रमाणात हरित पट्टे आणि खुली मैदाने उपलब्ध होतील. एक्सपिरिअन्स सेंटरमध्ये विशेष डिजिटल आणि सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात बायोमेट्रिक सर्व्हे, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि पुनर्वसन प्रक्रियेची अचूक माहिती दिली जाणार आहे.