सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं काम सुरु झालंय. तीस किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम हे प्रगती पथावर पोहचलंय. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आली आहे. रेल्वे मार्गाचं काम अठरा महिन्यात पूर्ण होईल असं पाटलांनी म्हटलंय.