जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. चाळीस गावातील पोदार स्कूल जवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून हवेत गोळीबार केलाय. बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले याच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे. दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. हवेत गोळीबार करणारे काही संशयित सीसीटीव्ही त कैद झालेत.