जालन्यातून धक्कादायक बातमी समोर येतेय... हप्ते भर नाहीतर मर अशी धमकीच वसुली एजंटने शेतकऱ्याला दिलीय.. वसुली एजंटने कर्जदाराला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची ऑडिओ क्लिप NDTV मराठीच्या हाती लागलीय... राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडच्या थकीत कर्जाची सक्तीने वसुली करु नका असे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र तरीही मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली सुरु आहे. एवढंच नाही तर कर्जदाराला थेट धमकावलं जातंय. आजच्या आज हप्ता भर. कर्ज भरायचे नसेल तर कुठे तरी जाऊन मरत का नाहीस, जीव का देत नाहीस? अशा शब्दात जालन्यातल्या या मायक्रो फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटने कर्जदाराला धमकावलंय.