Zilla Parishad Election Result 2026| 12 जि.प.125 पंचायत समित्यांचा निकाल,थोड्याच वेळात मतमोजणी

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे.थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून आता उद्या कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ