आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून मोठी जबाबदारी सोपवली आहे. छगन भुजबळ इच्छुक असताना नाशिकच्या संपर्कमंत्रीपदी कोकाटेंची निवड झाल्याने भुवया उंचावल्या आहेत.