Koyna Water Dispute | कोयनेचं पाणी मुंबईपर्यंत पोहचवण्याचा नेमका प्रकल्प काय ?

कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारं पाणी मुंबईला वळवण्यास महायुतीच्या नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय.. सांगली आणि कोकणातूनही या योजनेला विरोध करण्यात आलाय.. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर 67.5 टीएमसी पाणी मुंबईला वळवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या पाण्यावर रत्नागिरी जिल्ह्याचा पहिला हक्क असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी केलाय. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातूनही विरोधाचे जोरदार सूर उमटू लागले आहेत. मुंबईला पाणी देण्यापूर्वी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून द्या, अशी ठाम भूमिका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.

संबंधित व्हिडीओ