लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी Tamil Nadu च्या मुख्यमंत्र्यांची निवडणुकीपूर्वीच जबराट खेळी | NDTV

मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील १.३१ कोटी महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५,००० रुपये जमा केल्याचे जाहीर केले. 'कलैग्नर महिला हक्क अनुदान योजनेअंतर्गत ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या ५ हजार रुपयांपैकी फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यांसाठी दरमहा १,००० रुपये आगाऊ देण्यात आलेत..उन्हाळी विशेष मदत म्हणून अतिरिक्त २,००० रुपये जमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी द्रमुक पक्षाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संदेशातून स्टॅलिन यांनी सांगितले की, ही मदत केवळ आर्थिक साहाय्य नसून महिलांच्या समाजातील योगदानाची दखल आहे. स्टॅलिन यांनी 'द्रविडियन मॉडेल २.०' अंतर्गत डीएमके पुन्हा सत्तेत आल्यास मासिक मदत २,००० रुपये करण्याचेही संकेत दिले आहेत.

संबंधित व्हिडीओ