महसूल विभागातर्फे जमीन मोजणीच्या प्रकरणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता जमीन मोजणी फक्त ३० दिवसांत करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे कोट्यवधी प्रकरणे मार्गी लागणार असून, खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.