मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज NDTV मराठीच्या गणरायाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळाचे संकट लवकर दूर व्हावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना बाप्पाचरणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना मंगल प्रभात लोढा यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले.. दुष्काळासारख्या गंभीर विषयावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.