#ManojJarange #MarathaReservation #MantralayaMeeting मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मराठा उपसमितीची मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनावर आणि मराठा आरक्षणाच्या पुढील वाटचालीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर सरकारची नेमकी काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.