यंदा महायुतीला आणि महाविकास आघाडीला बंडखोरांचं मोठं आव्हान असणार आहे. ज्या जागांवर दोन उमेदवार असतील तिथे चर्चेतून मार्ग काढला जाईल अशी माहिती शरद पवार देतायत तर दुसरीकडे महायुती ज्यांनी अपक्ष अर्ज भरलेत त्यांनी मागे घ्यावेत अशी सूचना बावनकुळे यांनी बंडखोरांना केली आहे.