Mira Bhayandar पालिकेत घड्याळांच्या खरेदीत घोटाळा ? 400 रुपयांच्या घड्याळासाठी 2000 रुपये मोजले

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातील खर्चावरून वाद पेटलाय.. वॉल क्लॉक खरेदीत बाजारभावापेक्षा जास्त दराने देयक अदा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, ७०० टी-शर्टच्या वितरणाची नोंद आणि निविदा प्रक्रियेत सादर झालेल्या तीन कोटेशनमधील मजकूर एकसारखा असल्याच्या दाव्यामुळे संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी अॅडव्होकेट कृष्णा गुप्ता यांनी वॉल क्लॉक खरेदीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ४०४ रुपयांना उपलब्ध घड्याळासाठी प्रति नग २,००० अदा केल्याचा आरोप अॅड. कृष्णा गुप्ता यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ