आज मराठी भाषा दिन.प्रत्येक मराठी माणसासाठी आज गौरवाचा दिवस.साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो.एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी हे मुळचे बंगाली असूनही उत्तम मराठी बोलतात,महाराष्ट्रात प्रशायकीय अधिकारी म्हणून काम करतांना त्यांना भाषेचा काही अडसर आला का,त्यांनी मराठी भाषा कशी अवगत केली, यासंदर्भात आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी संवाद साधला आहे एनडीटीव्हीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी.