खासदार Omraje Nimbalkar यांची दिल्लीकडे कूच, थोड्याच वेळात पुण्याहून विमानाने दिल्लीला रवाना

धाराशिवच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी वेग घेताना दिसत आहेत… खासदार ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात पुण्याकडे रवाना होणार असून, तेथून ते दिल्लीला जाणार आहेत.उद्यापारी दिल्लीमध्ये होणाऱ्या बंडखोर खासदारांच्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला ओमराजे हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे… आणि त्यामुळे ठाकरे गटासाठी ही आणखी एक डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आता दिल्लीतील या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडतं… आणि ओमराजे कोणती भूमिका घेतात… याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ