आता मुंबईतली एक धक्कादायक घटना... पती शारीरिक आणि मानसिक छळ करतो, सासू टोमणे मारते म्हणून मुंबईतल्या एका शिक्षिकेनं गळफास लावून आत्महत्या केलीय..... या शिक्षिकेचा नवरा म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे... लाखो रुपये हुंडा देऊनही सासरच्यांचा हावरटपणा संपत नव्हता.... अखेर या त्रासाला वैतागून आणखी एक हुंडाबळी गेला...