#Mumbai #LocalTrain #MumbaiLocal #CSMT #MasjidBandar मुंबई लोकल ट्रेनमध्ये मस्जिद बंदर/सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सीएसएमटी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे झालेल्या प्रचंड गर्दी आणि गोंधळात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईच्या जीवनवाहिनीवरील गर्दीचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.