मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे....परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे....शहरातील गंभीर प्रदूषणाची समस्या 'जैसे थे' आहे...रविवारी प्रदूषणाला उकाड्याने तडका दिला आणि मुंबईकरांची प्रचंड दमछाक झाल्याची पाहायला मिळालीय...मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८०च्या वर म्हणजेच 'खराब' नोंदवली गेलीय....त्यात तापमानाने अचानक ३५ अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे...सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात तब्बल ४ अंशांची मोठी वाढ झाली आहे...