मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे...नायगाव रेल्वे स्थानकांवरील एक धक्कादायक घटनेचा आणखी एक नवा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.गोरेगावहून आईला भेटून परतत असताना एका 20 वर्षीय मुलीची एका प्रवाशाने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला..या प्रकाराला विरोध करत तरूणीने नायगाव स्थानकात उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला जाब विचारला. याच वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या सोफियाने आरोपीला चप्पल फेकून मारली...त्यानंतर आरोपीनेही तिला चप्पल मारत जोरात धक्का दिला. त्यामुळे ती लोकल आणि फलाटाच्या मधल्या जागेतून थेट रुळांवर पडली. त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिला स्वतःचा बचाव करता आला नाही. लोकलच्या चाकाखाली तिचा डावा हात आल्याने कोपरापासून हात कापला गेला...आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही संपूर्ण घटना संध्याकाळी गर्दीच्या वेळी घडली तरी तिच्या बचावासाठी कुणीच पुढे आलं नाही.त्यामुळे रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.