Nanded Crime News | वडिलांनी विवाहित लेकीसह प्रियकराला संपवलं, मृतदेह फेकले विहिरीत; नांदेड हादरलं

नांदेडमध्ये जन्मदात्या वडिलांनी स्वत:च्या मुलीला आणि तिच्या प्रियकराची हत्या केली.मृत संजिवनी कमळेचं वर्षभरापूर्वी थाटामाटात लग्न झालं होतं.लग्नापूर्वी संजिवनीचे लखन भंडारे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.लग्नानंतर ही दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरु होते. सोमवारी सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. त्यावेळी सासरची मंडळी देखील अचानक घरी पोहोचली. सासरच्या मंडळींनी सगळा प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी मुलीच्या प्रियकराला भेटायला बोलावलं.आणि दोघांना मारहाण करुन त्यांचा मृतदेह करकाळा शिवारातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून दिला.हत्येनंतर आरोपी वडील मारोती सुरणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी घडलेल्या घटनेची कबुली दिली. अखेर मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलं.आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

संबंधित व्हिडीओ