नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामधून बाळ चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांचा बाळ अज्ञातान चोरून नेलंय. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे.