बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. देशमुख कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते यामध्ये हजर राहतील. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.