पंढरपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला झालाय. भर वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी एकावर हल्ला झाला आहे. वाहतूक पोलीस आल्यानं हल्लेखोर फरार झाले आहेत. सकाळी भर चौकात कोयत्याने वार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्याचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये.