पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) उद्घाटनासाठी उद्या दुपारी (२:३० वाजता) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यासाठी येत आहेत. त्यांचे विमान थेट या नव्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणार आहे. या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन तसेच ९ ऑक्टोबर रोजी बीकेसी (BKC) येथील कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहेत.