Solapur मध्ये राजकीय वाद, सोलापूर हादरलं... MNS कार्यकर्ता बाळासाहेब सरवदे यांना संपवलं | NDTV मराठी

सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या, बाळासाहेब सरवदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप होतोय.सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला.प्रभाग दोन मध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्याच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावं यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठे वाद झाले, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले.मात्र त्याचं वेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केलाय.ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ