मुंबई ही गुजरातची राजधानी होती. असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय. शिंदेंनी जय गुजरात म्हटल्यानंतर झालेल्या टीकांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.गुजरात हे आपलेच शेजारी राज्य आहे, ते काही पाकिस्तानात नाही.त्यामुळे त्यावरून राजकारण करु नका असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या आधी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं जाधव म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यावरुन आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.