मागील दोन दिवसांपूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते.याप्रकरणातील आरोपींचं स्केच आता पोलिसांनी जारी केलीय.स्वामी चिंचोलीच्या हद्दीत पहाटे सव्वा चारच्या सुमारास देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना चहासाठी थांबले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती.याचवेळी त्यातील एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार देखील केला.अद्याप या प्रकरणातील आरोपी फरार आहे.दौंड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या प्रकरणातील संशयित आरोपीचं स्केच दौंड पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दर्शनासाठी निघालेला प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले दागिने, दौंड अत्याचारप्रकरणातील आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध