पुण्यात बॅनर लावण्याच्या वादातून एका नगरसेविकेच्या भावावर टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण करणारे भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोहिया नगर, काशेवाडी परिसरात बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन एका गटाने टोळक्याने हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनू कांबळे जखमी झाले असून त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.