पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटासाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. त्यामुळे आता निकाल जाहीर होणार असून पुणे झेडपीत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पुणे जिल्ह्यातील आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या तालुक्यात देखील मतमोजणीला ठिकठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंग रूम जवळ सुरुवात होईल... आंबेगाव तालुक्यात 5 जिल्हापरिषद आणि 10 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी ही पार पाडणाऱ्या येथे दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे वेग वळसे पाटील यांची लढत ही लक्षवेधी ठरत आहे या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.