Pune Rave Party| एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत, आतापर्यंत काय-काय घडलं? पाहा लेटेस्ट अपडेट

पोलिसांनी मध्यरात्री खराडीमध्ये छापेमारी करून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केलाय.या पार्टीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आलंय. या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारु हुक्क्याचं सेवन सुरु होतं.. यात दोन महिला, पाच पुरुषांचा सहभाग होता. धक्कादायक म्हणजे यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचाही सहभाग होता. एकीकडे पोलीस छापेमारी करत होते, त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी खेवलकरच्या घरी छापा टाकलाय. यावेळी पोलिसांनी हार्डड्राईव्ह आणि लॅपटॉप जप्त केलाय.

संबंधित व्हिडीओ