खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर जोरदार राजकारण सुरू झालंय... जावयी दोषी असेल तर समर्थन करणार नाही, पण अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सोडणार नाही, असा इशारा खडसेंनी दिलाय... तर ट्रॅप लावला असं खडसे म्हणत असतील, तर आधीच जावयाला अलर्ट का केलं नाही, असा प्रश्न गिरीश महाजनांनी विचारलाय.... तर या प्रकरणी राजकीय टायमिंगवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय