भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरुन गेलंय.. शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे नावाच्या एका व्यक्तीवर सहा जणांनी हल्ला केला. सहा आरोपींपैकी चौघांकडे कोयते आणि दोघांकडे गन होती...आधी गोळीबार आणि मग
कोयत्याने वार करत हल्लेखोर पळून गेले... घटनास्थळी मोबाईल, बंदुका आणि मॅगझिन्स सापडलीय.. आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय... मंदार किवळे, शुभम चव्हाण प्रकरणातील आरोपी होता.