संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी मोर्चाला हजेरी लावली. शिवाय हजार हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालेला होता. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.