संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोर्टात सुनावणीदरम्यान SIT ने या घटनेतील महत्त्वाचे धागेदोरे समोर आणले आहेत. देशमुख यांची हत्या होत असताना आरोपी व्हिडीओ तयार करुन पाशवी आनंद लुटत होते हा व्हिडीओ ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच हत्येसाठी ज्या हत्यारांचा वापर करण्यात आला ती देखील हस्तगत करण्यात SIT ला यश आलं आहे.