मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यात मुंबईतील मनसेच्या सर्व विभाग विभाग अध्यक्षांना बोलावण्यात आलेलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. विधानसभेत जोरदार फटका बसल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांवर मनसेकडून लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेची महत्त्वाची बैठक शिवतीर्थ वर बोलावलेली आहे. मुंबईतील मनसे विभाग प्रमुखांची ही बैठक असणार आहे.