मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात आज दोन्ही ठाकरेंची तोफ धडाडली.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर एकाच सभेत उभे राहिले. या सभेसाठी दोन्ही पक्षांचे मुंबईतील उमेदवार आणि हजारो सैनिकांची गर्दी जमली होती. ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कातील सभेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.. भाजप नेते अण्णामलाई यांचं मुंबई बाबतच वक्तव्य, हिंदी भाषा सक्ती, भाजपमधील निष्ठावंत, शिवसेनेतील फूट अशा अनेक विषयांवर ठाकरे बंधूंनी भाजपवर टीका केलीय..