निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासलेंना बीड पोलिसांनी घेतल ताब्यात घेतलंय. पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये कासले वात्सव्यास होते. सकाळी 11 च्या सुमारास पोलिसांना शरण जाणार असल्याचं कासलेंनी सांगितलं होतं.मात्र त्याआधीच हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेंना ताब्यात घेतलं.परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, त्यासाठीच आपल्याला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर 10 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी सांगितलं होतं.वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोपही कासलेंनी पुन्हा एकदा केला. कासलेंना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यात...