शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय. एकशे पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने रत्नागिरीच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. सुभाष बने यांच्या पक्ष प्रवेशामुळे अठरा ते वीस हजार मतदान शिंदे यांच्या बाजूने झुकणार असल्याचा दावा सध्या केला जातोय. तर आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत सुभाष बने हे आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह जाहीर पक्षप्रवेश करतील मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय जिल्ह्यामध्ये हे जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. तब्बल एकशे पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने रत्नागिरीच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. एकंदरीतच उदय सामंत यांच्या पुढाकारानं जिल्ह्यामधील माजी आमदार सुभाष बने आणि गणपतराव कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज पक्ष प्रवेश करणार आहेत.