रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पुढचे 4 दिवस महत्वाचे आहेत. आजपासून पुढचे 4 दिवस रत्नागिरीत आँरेज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. कालही दिवसभर जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळला. सतत पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. आजही दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीतल्या काजळी नदी काठावरून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी