नागपूर शहरातील काही ठिकाणी मॅनहोल आणि पावसाळी नाल्यांची झाकणे उघडी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. नागपूरच्या शंकरनगर चौकातील मेट्रो स्टेशनजवळील फूटपाथवरील पावसाळी नाल्यांची झाकणे गायब असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्यांवर पाणी साचले होते. त्यावेळी दोन महाविद्यालयीन तरुणी या खड्ड्यात पडून जखमी झाल्या.. मुंबईतील घटनेनंतर तरी नागपूर महानगरपालिकेने शहरातील उघडे मॅनहोल आणि नाल्यांची झाकणे तातडीने बसवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.