सैफ अली खान याने देवासारखं धावून आलेल्या रिक्षा चालकाची भेट घेतली.. त्याने रिक्षाचालक भजनसिंह राणासोबतचा फोटो शेअर केलाय.. रिक्षाचालक भजनसिंह आणि सैफ अली खान याच्या या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता सैफ अली खानवर आरोपीने चाकूने हल्ला केल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. यावेळी सैफला आपली कार काढणं शक्य झालं नव्हतं त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला हात दाखवत सैफ तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल झाला होता.